वंदना नेटके यांना दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण समितीचा " सावित्रीची लेक " पुरस्कार जाहिर. .. !!!

वंदना नेटके यांना दिल्ली येथील  लोकशाहीर जनकल्याण समितीचा " सावित्रीची लेक " पुरस्कार जाहिर. .. !!!

श्रीरामपूर ः
  जिल्हा पुरवठा विभागातील अव्वल कारकून वंदना नटके यांना नुकताच नवी दिल्लीतील लोकशाहीर जनकल्याण  समितीचा ‘सावित्रीची लेक’
हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
वंदना नेटके या अहमदनगर जिल्हा पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामाचा ठसा त्या ज्या ठिकाणी बदली होवून  जातील अशा ठिकाणी उमटविला आहे. त्या काही काळ श्रीरामपूर येथील पुरवठा प्रभारी गोदामपाल म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची अहमदनगर येथे बदली झाली. श्रीरामपूरला असतानाही त्यांनी चांगले काम केले. त्यांना ‘सावित्रीची लेक’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वस्त धान्य दुकानदारांच्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष मिनाताई कुळकुंबे, तालुकाध्यक्ष माणिक जाधव, प्रसिद्धीप्रमुख मंगेश छतवाणी, नरेंद्र खरात, शिवाजी सैद, राहुल पगारे, सी.बी.गायकवाड, आर.जी.काळे, संतोष वेताळ, दिलीप त्रिभुवन, सोमनाथ देवकर, एन.एस.गंगवाल, लक्ष्मणराव खंडागळे, विजय म्हस्के, विजय वैराळे, पी.बी.छतवाणी आदींनी स्वागत केले आहे.. !!