खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त उमंग फाउंडेशन च्या वतीने रक्त शुद्धीकरण हिजमा कॅम्पचे आयोजन

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त उमंग फाउंडेशन च्या वतीने रक्त शुद्धीकरण हिजमा कॅम्पचे आयोजन

श्रीरामपूर ::--
 अहमदनगर चे खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमंग फौंडेशन च्या वतीने रक्त शुद्धी करण हिजमा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.त्या निमित्ताने शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान रहेमानखान पठाण यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली.  त्यावेळी हिजमा करणाऱ्या बांधवाना त्यांनी निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. व उमंग फौंडेशन च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व संचालकांना देखील अशीच समाजसेवा तुमच्या घडो व भावी कार्यासाठी वतीने मी आपणांस  शुभेच्छा देत आहे असे त्यांनी या वेळी सर्वाना सांगितलं. यावेळी त्यांचा उमंग फौंडेशन वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सचिन चौगुले, सुरेश आरणे. समीर शेख,ढमढेरे सर,अनिस पठाण.अल्ताफ पठाण इत्यादी मान्यवरा सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
(प्रतिनिधी - दिपक कदम बी.पी.एस.न्यूज श्रीरामपूर  )