गुंजाळे येथील वेश्या व्यवसायावर छापा, तीन परप्रांतीय मुलींची सुटका एक आरोपी ताब्यात .

गुंजाळे येथील वेश्या व्यवसायावर छापा, तीन परप्रांतीय मुलींची सुटका एक आरोपी ताब्यात .

*गुंजाळे येथील वेश्या व्यवसायावर छापा*

*तीन पीडित परप्रांतीय मुलींची सुटका व एक आरोपी ताब्यात* 

*DySP संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई*

 

           दि.02/02/2023 रोजी डिवायएसपी  संदीप मिटके व त्यांच्या पथकाने वांबोरी ते पांढरीपूलमार्गे जाणाऱ्या रोडवर गुंजाळे गावच्या परिसरात चालणाऱ्या कुंटनखान्यावर छापा टाकला आहे. गुंजाळे शिवारात हॉटेल मित्रप्रेमच्या डाव्या बाजूला एका शेतात आरोपी रवी ऊर्फ संजय गायकवाड (वय - 31 वर्षे )हा आर्थिक फायद्यासाठी सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करत असल्याची गुप्त बातमी पोलिस विभागाला मिळाली होती.  

 

        मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली असून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे . 

 

     वरिल घटनेनुसार पो.कॉ रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी रवि उर्फ संजय राजू गायकवाड रा. गुंजाळे ता. राहुरी याचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गु.र.न.122 /2023 महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वांबोरी परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

 

              *सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी संदीप मिटके , राहुरी पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे, सोनई पोलिस विभागाचे एपीआय माणिक चौधरी, स.फौ.अकोलकर, पो.हे कॉ.चंद्रकांत ब-हाटे, पो.ना,पारधी,म.पो.ना कोहकडे, पो.कॉ ताजणे, शिंदे,साखरे,नदीम शेख,ठोंबरे, आदींनी केली केली.*