अहमदनगर म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी पेट्रोलपंपा शेजारी नगर मनमाड हायवेवर झाला भिषण अपघात.

अहमदनगर म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी पेट्रोलपंपा शेजारी नगर मनमाड हायवेवर झाला भिषण अपघात.

म.फु.कृ.विद्यापीठ पेट्रोलपंपा शेजारी नगर-मनमाड हायवे रोडवर दुपारी २.३० वा.बोलेरो गाडी क्र.MH 16 BH 1076 व बजाज कंपनीची CT100 गाडी क्र. MH-17 U 17O6 या गाडीचा भिषण अपघात झाला आहे यामध्ये चंद्रगिरी देवस्थान पानेगाव मांजरी येथील बालकदास महाराज गोलवाले मुळ झाशी येथील असून सध्या तीन महीन्यापासून पानेगाव मांजरी येथील चंद्रगीरी देवस्थान येथे वास्तव्यास होते ते नगर मार्गाने राहुरीकडे चालले असता विद्यापीठाच्या पेट्रोलपंपाकडे पेट्रोल भरण्यास वळाले असता अचानक राहुरीकडून नगरकडे भरधाव वेगाने बोलेरो गाडीने महाराजांना उडवले व गाडी ने तीन पलट्या खाऊन बोलेरो गाडी शेजारील साईट गटारात जाऊन पडली त्यामध्ये दोघे इसमांना व बालकदास महाराज गोलवाले यांना अंबुलन्सने नगरकडे उपचाराकरीता नेले आहे यामध्ये महाराजांची परीस्थीती चिंताजनक आहे बोलेरो गाडी ही कान्हुर पठार ता.पारनेर येथील आहे असे समजले.