जो सर्वसामान्य जनतेचे काम करेल तोच राजकारणात टिकेल हाच अंतिम संदेश - देवेंद्र लांबे पा.

जो सर्वसामान्य जनतेचे काम करेल तोच राजकारणात टिकेल हाच अंतिम संदेश - देवेंद्र लांबे पा.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अशोक तनपुरे, रोहित नालकर, विजय पटारे, नारायण धोंगडे ,महेंद्र शेळके ,संतोष लांबे ,दीपक तिडके,अविनाश क्षीरसागर, संकेत शेलार,गोरख दौडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले की हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारे काम शिवसैनिकांनी राहुरी तालुक्यामध्ये करायचे आहे. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हा दिलेला संदेश प्रत्येक शिवसैनिकाने अंगीकृत करून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम करावे.जो सर्व सामान्य जनतेची कामे करेल तोच राजकारणात यशस्वी होईल. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाम एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने ग्रामीण भागात शिवसेना संघटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना पक्षाच्या सर्वसामान्य उमेदवारांना काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांनी कामाला लागावे असे श्री.लांबे म्हणाले.