शिवांकुर विस्डम स्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन,विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक आरोग्य चांगले असावे - डॉ.प्रकाश पवार
शिवांकुर विस्डम स्कूल खडांबे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास देखील झाला पाहिजे त्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले असावे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले .
शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी मध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांक वाढीसाठी, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी, रक्तवाढीसाठी मोफत औषध वाटप करण्यात आले तसेच दंतरोग तज्ञ डॉ प्रतीक चौहान यांनी देखील मुलांच्या दातांची मोफत तपासणी करून त्यांना दातांची स्वच्छता कशी ठेवावी याचे मार्गदर्शन केले तर डॉ गौरी पवार यांनी सध्याच्या काळात टीव्ही आणि मोबाईल यांच्या अति वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम कसा होतो तसेच अती वापर कसा टाळावा यावर मार्गदर्शन केले.
आरोग्य शिबिर संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार, संस्थेच्या विश्वस्त डॉ गौरी पवार व दंतरोगतज्ञ डॉ प्रतिक चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. तसेच या आरोग्य शिबिरासाठी *संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांचे मार्गदर्शन लाभले*.
या आरोग्य शिबिराचे सूत्रसंचालन श्रद्धा सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव पर्यवेक्षक अरुण खिलारी, ऊमा कारंडे, श्रद्धा सोनवणे, स्वाती लहारे, संजय बलमे, सोमनाथ कावरे, सुनील हरिशंद्रे, परिवहन विभाग प्रमुख अशोक गाडे आदीसह पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्वाती लहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.