वाढदिवस निमित्त जिल्हा परिषद शाळेत वह्या व पेन वाटप करून समाजापुढे ठेवला आदर्श.
*वाढदिवस निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे वह्या व पेन वाटप.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे सिद्धांत रामानंद मुंगसे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आली.
यावेळी शाळेच्या वतीने सिद्धांत व प्रमुख मान्यवरांचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जेष्ठ पत्रकार बन्सी एडके यांनी भूषवले. तर त्यावेळी पत्रकार युनूस पठाण ,बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे , बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सिद्धांत ने अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप करण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श उभा केला त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .तर यावेळी दत्तात्रय धामणे सर, अश्विनी कदम मॅडम, कदम मॅडम ,कारंडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब सावंत सर यांनी केले .तर आभार बथूवेल डी. हिवाळे सर यांनी मानले.