चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
*चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महिलांच्या शिक्षणात ज्योत पेटविणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या, शिक्षणाच्या महामेरू क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तुकाराम बाबुराव तांबे होते. तर प्रमुख पाहुणे सलाबतपूर चे सरपंच अझहर शेख उपस्थित होते.
सावित्रीबाईंचा वेश धारण केलेल्या विद्यार्थिनी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या. सावित्रीबाई फुले यांचे विचार अनेक विद्यार्थिनींनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तुकाराम बाबुराव तांबे यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. व त्यांचा आदर्श व विचार जीवनात विद्यार्थ्यांनी अंगीकारावे असे आवाहन केले. प्राचार्य रवींद्र गावडे सर यांनी आपल्या मनोगतात, सावित्रीबाई फुलेंचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले सावित्रीबाईंचे कार्य ही जगासाठी संजीवनी समान आहे. असे प्रतिपादन केले. पालक रावसाहेब दगडू भगत यांनी शाळेस सावित्रीबाईंची प्रतिमा भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय गरुटे सर, प्रस्ताविक सौ मीनाक्षी तांबे मॅडम यांनी केले व आभार श्री शाहरुख सय्यद सर यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.