शिवजयंती निमित्त राहुरीत जिजाऊंच्या लेकीकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन .

शिवजयंती निमित्त राहुरीत जिजाऊंच्या लेकीकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन .

शिवजयंती निमित्त राहुरीत जिजाऊंच्या लेकिंकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन .

Delhi91 News ची शिवजयंतीची विशेष बातमी .

            राहुरी येथे १९ फेब्रुवारी रोजी सालाबादा प्रमाणे मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समिती व जिजाऊंच्या लेकी समुहाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत राहुरी शहरात भव्य शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली.

            राहुरी शहरात मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या हस्ते सकाळी छत्रपती चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भगवी पताका फडकावून मानवंदना देत शिवजयंती उत्सवाला सुरवात करण्यात आली.या प्रसंगी वैभव तनपुरे ,विलास थोरात सर,मुन्ना तनपुरे,रवींद्र तनपुरे,अशोक तनपुरे,नामदेव वांढेकर,विनायक बाठे,विशाल लोहार,संभाजी शिरसाठ,अण्णा गुंजाळ,रवींद्र आहेर,महेंद्र शेळके उपस्थित होते.

            दुपारी मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आनंद ऋषीजी उद्यान येथे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या कार्यक्रमात चि.शिवराज रासने याने आपल्या दिव्यांगपणावर मात करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण भाषण केले त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौत्तुक केले जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करत शिवजयंती मिरवणुकीस सुरवात करण्यात आली.या मिरवणुकीत राहुरी येथील जिजाऊच्या लेकी ग्रुप यांच्या वतीने तयार करण्यात आलेले टाळ पथक व लेझीम पथक यांच्या संचलनाने संपूर्ण राहुरीकरांचे मन जिंकून घेतली.मिरवणुकी दरम्यान राहुरी शहरात ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले.

              शिवजयंती उत्सवास आ.प्राजक्त तनपुरे,सौ.उषाताई तनपुरे,पो. नि.संजय ठेंगे, सभापती अरुण तनपुरे,रावसाहेब चाचा तनपुरे,शिवाजी डौले यांनी भेट दिली.टाळपथक यशस्वी करण्यासाठी संगीत शिक्षिका ज्याती वर्पे,श्रुती वर्पे यांनी योगदान दिले.शिवजयंती निमित्त गोशाळेला चाऱ्यासाठी मराठा एकीकरण समितीचे विनायक बाठे यांच्यावतीने बंटी पटारे यांच्याकडे ७५५१ रु.रक्कम देण्यात आली.

              कार्यक्रमा नंतर शिवजयंती उत्सव समिती यांच्याकडून शिवभोजन देण्यात आले.शिवजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी देवेंद्र लांबे,सतीश घुले,संदीप गाडे,महेंद्र उगले,रोहित नालकर,अशोक तनपुरे,अविनाश क्षीरसागर,विजय कोहकडे,जालिंदर कोहकडे, विनीत तनपुरे, मधुकर घाडगे,सागर ताकटे,महेंद्र उगले,ईश्वर गाडे,बंटी पटारे,संतोष लांबे, विजय पटारे,कुलदीप नवले,सागर पाटील,विशाल पटारे, जिजाऊच्या लेकी ग्रुपच्या अश्विनी कल्हापुरे,राजश्री घाडगे,वैशाली शेळके,ज्योती नालकर,विद्या अरगडे,वर्षा लांबे,पल्लवी वामन,पोर्णिमा फुलसौंदर,सुजाता लगे,रोहिणी कोल्हे,कविता नरोडे,सुरेखा माकोने,भारती तनपुरे,पुनम शेंडे,राणी घाडगे आदींनी परिश्रम घेतले.

 

          पारंपारिक शिवजयंती कशी असावी याचा लेखाजोखा महिलांकडून सादर करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा महिलांचा सन्मान मराठा एकीकरण समितीचे सदस्य व देवेंद्र लांबे नेहमीच करत असतात.महिलांचा जिजाऊंच्या लेकी ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. सौ.उषाताई तनपुरे*

         प्रत्येक कार्यक्रमात जेवणा दरम्यान पुरुषांना प्रथम प्राधान्य दिले जाते परंतु शिवजयंती उत्सव समिती कडून महिलांना जेवणासाठी प्राधान्य देत महिलांचा सन्मान दिला.*