अहमदनगर जिल्ह्यातील ता.श्रीरामपूर बेलापूर पोलिस दादांच्या वर्दीवरील ब्रिदवाक्य नावालाच राहीले की काय ?
दि.२८/१२ /२०२३ रोजी बेलापूर पोलिस हद्धीमधील गोखलेवाडी येथील आकाश छबूराव रजपूत या विवाहित तरुणाने पहिली बायको असतांना तीला त्याचेपासून १ मुलगा व १ मुलगी असे दोन आपत्ये असतांना मोबाईल च्या फेसबूक द्वारे मध्यप्रदेश येथील जिल्हा जबलपूर ता.पनागर येथील मोहारी गावातील आरती रामकिसन कौल नामक एका अविवाहित तरुणीशी फेसबुक वर प्रेम संबंध करून तीला त्याच्या पुर्व आयुष्याची सुचना न देता गोखलेवाडी येथे त्याच्या घरी घेऊन आला त्यापूर्वी त्याच्या विवाहीत पत्नीस त्याने ता.राहुरी च्या डिग्रस गावात तिच्या माहेरी आई वडिलांजवळ किरकोळ वाद घालुन सोडले होते
त्यानंतर त्या विवाहितेच्या आई वडिलांना जावयाने केलेल्या पराक्रमाची चाहुल लागताच मुलिच्या सासरी मुलगी व त्यांचे दोन छोटे नातवंडे घेऊन सासरी येताच त्यांना घडला प्रकार समजताच बेलापूर पोलिस ठाणे येथे धाव घेतली असता तेथील पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची कुठलीच दखल न घेता त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले त्या नंतर त्यांनी दि.०३/ जानेवारी /२०२४ रोजी पुन्हा घडलेल्या प्रकाराबाबत जावई व या प्रकारामध्ये त्याचेसोबत असनार्या त्याच्या नातेवाईक मित्र यांचेवर कार्यवाही करावी या हेतू उद्धेशाने पुन्हा सदर बेलापूर पोलीस ठाणे येथे गेले असता त्या ठिकाणी पोलीसांनी पहिली पत्नी व मुले असतांना दुसरी आनल्यास भा.द. वि. १८६० चे कलम ४९४ प्रमाणे गुन्हा दाखल करुण घेणे अपेक्षीत असतांना या प्रकारातील जावई आकाश,त्याचे सहकारी व मुलाच्या आई वडिल व त्या प्रकारातील त्याच्या सोबत्यास बोलावले यावर फक्त पोलीसांनी तोंड भांडवलच करून त्यांना वाट लावून दिल्याचा प्रकार घडला आहे तरी सदरील प्रकाराची योग्य तपासणी मध्यप्रदेश येथून फसवून आनलेल्या त्या मुलीच्या घरच्यांच्या ताब्यात त्या मुलीस स्वाधीन करून त्याच्या पहिल्या विवाहीत पत्नीला व लहान मुलांना पोलिस अधिकार्याने न्याय द्यावा व स्त्रीयांवर अशा प्रकारच्या होणार्या अन्यायाला वेळीच आवर घालावा अशी जनतेतील सर्वसामान्यांच्या होत असलेल्या कुजबुजत मागणी व बेलापूर पोलीस ठाणे येथे व्हाइस CCTV कॅमेरे त्वरित बसवण्यात यावे व येथे होनारा पोलीसांकडून अन्याय DYSP श्रीरामपूर यांचेपर्यंत पोहोचण्यास विलंब लागनार नाही येथील पोलीस अधीकार्यांचे चांगलेच कारनामे कानावर आले आहेत ते प्रत्यक्षात बघुन तरी अधिकारी काम करेल.