अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील शाळांमध्ये सुरू केली कायदेविषयक जनजागृती मोहीम .

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील शाळांमध्ये सुरू केली कायदेविषयक जनजागृती मोहीम .

*महेश मुनोत विद्यालय वांबोरी येथील शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद .* 

 

 

          राहुरी तालुक्यातील शालेय विद्यार्थिनींना पळवून नेण्याच्या घटना किंवा त्यांना अमित दाखवून पळवून नेण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पालक वर्गामध्ये चिंचेचे वातावरण पसरले असून या विद्यार्थिनींना पळवून नेणाऱ्यांमध्ये व त्यांना सहकार्य करणारे जवळचेच असल्याचे निदर्शनास आले आहे . शालेय विद्यार्थिनींमध्ये या गोष्टींविषयी जागृत करण्याचे काम राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हाती घेऊन चांगला उपक्रम सुरू केला आहे .आज दिनांक 12 /2 /2024 रोजी राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील महेश मुनोत विद्यालय वांबोरी येथे भेट देऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला .कायदेविषयक जनजागृती तसेच नैतिक मूल्याची जोपासना व्हावी याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

     

         सदर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे. 

 

         सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यास कुणी सहकार्य करत असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आव्हान राहुरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.