सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल नेवासा भाजप च्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल नेवासा भाजप च्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा

        

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ 

घेतल्याबद्दल नेवासा भाजप च्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा

 

नगर प्रतिनिधी::

 

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल  शपथविधीनंतर नेवासा शहरांमध्ये नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. त्याप्रसंगी भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम चे नारे देण्यात आले व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ‌.भारताचे नवनिर्वाचित सलग तिसऱ्यांदा  पंतप्रधान पदी माननीय नरेंद्र भाई मोदी होत असल्याचा आनंद कार्यकरते व पदाधिकाऱ्यांनी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . या उत्सवामध्ये भारतीय जनता पार्टीचे व परिसरातील शहरातील सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात व जल्लोषांमध्ये एकत्रित येऊन जल्लोष केला. मोदी साहेबांनी पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करावे व देशाला जगाच्या पाठीवर नंबर एक चे राष्ट्र बनवावे अशी अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.यावेळी नेवासा शहराध्यक्ष  रोहित पवार, नगरसेवक सुनील जी वाघ, नेवासा भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुभाष पवार , प्रतीक शेजुळ, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष  विवेक नन्नवरे,  गोरक्षनाथ बेहळे, ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्य  मनोज डहाळे, व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र मुथा, सतीश गायके,मनसे शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे, मनसे नेते संतोष गव्हाणे, भाजप कार्यकर्ते आदिनाथ पटारे, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ,  शरद पंढुरे,  गणेश सोनवणे, शहर उपाध्यक्ष  शंकर कनगरे, बंडू वाघमारे, अनिल वंजारे, संतोष चांदणे, शहर सरचिटणीस निखिल जोशी, रुपेश उपाध्ये, प्रताप कोंगे,     किरण दारुंटे, विनोद नळकांडे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.