आदित्य पवार यांचा आयसीटी मुंबई येथे पदवीदान समारंभ पार पडला
आदित्य पवार यांचा आयसीटी मुंबई येथे पदवीदान समारंभ पार पडला
नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील कृषी भूषण ज्ञानेश्वर गंगाधर पवार यांचे नातू व पुनतगावचे माजी सरपंच साहेबराव पवार व स्वर्गीय माजी सरपंच सौ द्वारकाबाई पवार यांचा धाकटा चिरंजीव आदित्य पवार यांनी ICT मुंबई येथे त्याचा 10 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोठ्या उत्साहात दीक्षांत समारंभ पार पडला, आदित्य याने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा (मुंबई) येथे फायबर अँड टेक्सटाईल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.
ही पदवी घेतली, आयसीटी (मुंबई) चे कुलपती पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरु प्राध्यापक अनिरुद्ध पंडित सर, आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
आदित्य पवार यांचे पंचकोशीतून अभिनंदन होत आहे, एकूण चार वर्षाचा कोर्स असून अतिशय खडतर अभ्यास करून आदित्य यांनी हे यश संपादन केले आहे, या यशा बद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख तसेच मा सौ सुनीताताई गडाख यांनी अभिनंदन केले, या कामी आजोबा कृषी भुषण माऊली पवार, वडील माजी सरपंच साहेबराव पवार, मामा मुळा कारखाना चेअरमन नानासाहेब तुवर, तत्कालीन सीएटी सेल चे मुख्य अधिकारी आनंद रायते साहेब, प्रा नारायण शिंदे, सीताराम पवार (अमेरिका), अमोल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले,