अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा -मा. विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती.माधुरी एच.मोरे यांची कार्यवाही -तसेच सरकारी वकिल श्रीमती.मनिषा पी.केळगंधे यांनी काम पाहीले.

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा -मा. विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती.माधुरी एच.मोरे यांची कार्यवाही -तसेच सरकारी वकिल श्रीमती.मनिषा पी.केळगंधे यांनी काम पाहीले.

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा " अहमदनगर आरोपी नामे अक्षय अशोक भिंगारदिवे , वय २२ वर्षे , रा . शिवाजीनगर केडगाव , अहमदनगर याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मा . विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती . माधुरी एच . मोरे साहेब यांनी आरोपी अक्षय अशोक भिंगारदिवे यास भा.दं. वि.का. कलम ३५४ ( अ ) ( ड ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ( पोक्सो ) २०१२ चे कलम १२ प्रमाणे अन्वये दोषी धरून १ महिना सक्तमजुरी व २,००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद , भा.दं.वि. का . कलम ३४१ अन्वये दोषी धरून १५ दिवस सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधी कैद , भा.दं.वि. का . कलम ३२३ अन्वये १ महिना सक्तमजुरी व २,००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली . याप्रकरणी सरकारी वकील म्हणुन विशेष सरकारी वकील श्रीमती , मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी काम पाहिले . सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि , दि . ११/०६/२०१८ रोजी रात्री ०८:३० चे सुमारास पिडीत अज्ञान मुलगी वय १४ वर्षे ही लिंक रोडवरील देवकर क्लासेस येथुन तिचे घरी पायी जात असताना भुषणनगर येथील पाण्याच्या टाकीसमोर आरोपी अक्षय भिंगारदिवे व त्याचा मित्र हे मोटारसायकवरून पिडीत मुलीच्या पाठीमागुन आले . आरोपीने सदर मोटारसायकल ही पिडीत मुलीच्यासमोर आडवी लावुन तिचा रस्ता आडवला व पिडीत मुलीला " मला तुझेशी बोलायचे आहे , त्यावर • पिडीत मुलीने त्याला " तु माझेशी बोलत जावु नकोस , माझा पाठलाग नकोस " वगैरे संभाषण झाल्यानंतर आरोपी हा मोटारसायकलवरून निघुन गेला . पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या घरी सांगितला . त्यानंतर पिडीत मुलीचा भाऊ व त्याचा मित्र हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी राधेशाम कॉम्पेक्स समोर , भुषणनगर केडगाव येथे भेटला . पिडीत मुलींच्या भावाने आरोपीला जाब विचारला असता आरोपीने रस्त्यावरील दगड उचलुन त्याच्या डोक्यात मारला व आरोपी तेथुन पळुन गेला . सदर घटनेबाबत पिडीत मुलीचे आई - वडिल हे पिडीत मुलीस व तिच्या भावास घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेवून गेले . पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे भा.दं. वि . कलम ३५४ अ , ड , ३४१ , ३२४ , ५०६ व पोक्सो कायदा कलम ११ ( ३ ) , १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला . सदर गुन्हयाचा तपास मपोसई के.डी. 

शिरदावडे यांनी करून मा . न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले . सदर खटल्याची सुनावणी मा . विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच . मोरे साहेब यांचेसमोर झाली . वरील खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंदे शिंदे यांनी काम पाहिले . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण • ०८ साक्षीदार तपासण्यात आले . सदर खटल्यामध्ये पिडीत मुलगी , पिडीत मुलीचा भाउ , पिडीत मुलीच्या भावाचा मित्र , पंच साक्षीदार तपासी अंगलदार , वैद्यकिय अधिकारी तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक व महानगर पालिका अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या . मा . न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुरावा विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा . न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी एलपीसी नंदा गोडे मॅडम यांनी विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंदे - शिंदे यांना मदत केली . 

अहमदनगर

 ता . २१/०३/२०२२ 

( मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे ) 

विशेष सरकारी वकील अहमदनगर .