देवळाली प्रवरा नगरपालिका माजी उपाध्यक्षांचे चिरंजिव प्रहार जनशक्ती पक्षात दाखल - आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा नगपालिका माजी उपाध्यक्षाचे चिरंजीव प्रहार मध्ये दाखल
देवळाली प्रवरा - दि. २१ मार्च
देवळाली प्रवरा नगपालिकेचे माजी उपाध्यक्ष यांचे चिरंजीव आणि राहुरी फॅक्टरी येथील सुप्रसिद्ध निवेदक यांनी आज शिव जयंतीच्या मुहूर्तावर प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी दिली.
प्रसंगी आमचे प्रतिनिधींशी बोलताना ढुस म्हणाले की, आज राहुरी फॅक्टरी येथे शिव जयंतीच्या मुहूर्तावर देवळाली प्रवरा नागरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष कारभारी वाळुंज यांचे चिरंजीव शरद वाळुंज यांनी व येथील सुप्रसिद्ध निवेदक राजेश मनचरे यांनी छोटेखानी कार्यक्रमात राहुरी फॅक्टरी येथे नामदार बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्ष्यात फॉर्म भरून प्रवेश केला.
या प्रसंगी प्रहारचे विजय कुमावत, सुनील कदम, प्रभाकर कांबळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, केवळ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असून नागरिकांमधून सदस्य होणेसाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.