गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोनई पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोनई पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

खेडले परमानंद प्रतिनिधी 

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोनई पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न 

सोनई पोलीस ठाण्यात शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी     डी वाय एस पी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली .यावेळी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,शिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे 

त्याचप्रमाणे सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांचे सरपंच , पोलिस पाटील व गणपती मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

      यावेळी डी वाय एस पी सुनील पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की कुठलाही जातीय तनाव निर्माण होईल असे वर्तन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

      गणपती मंडळांनी डी जे मुक्त गणेश उत्सव साजरा करावा. पारंपरिक वाद्य लेझीम ढोल कलापथक अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा.

        यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते की कुठलाही कार्यक्रम असो तो पार पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणचे झेंडे व बॅनर तीन दिवसात काटेकोर अंमलबजावणी करून काढण्यात यावेत.

 या गोष्टीची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिली

धार्मिक कार्यक्रमाला जेव्हा स्पर्धेचे स्वरूप येत तेव्हा अडचणी निर्माण होतात असे प्रतिपादन डी वाय एस पी पाटील यांनी केले.

        सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मिरवणूक मार्ग व मार्गदर्शक सूचना यांची माहिती उपस्थितांना दिली.