बालाजी देडगाव येथे हनुमान मंदिराचा श्रीमद् भागवत कथेने अखंड हरिनाम सप्ताहास उद्या सुरुवात.
बालाजी देडगाव (प्रतिनिधि युनुस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबाद प्रमाणे गुरुवर्य ,शांतीब्रह्म ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे.
दरवर्षी बजरंग दल च्या माध्यमातून विविध कार्यक्रमाने या सप्ताहाचे आयोजन केले जाते .याही वर्षी श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते, नामवंत कीर्तनकार ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री आळंदी देवाची यांच्या सुस्राव्य अमृतमय वाणीतून होणार आहे. या कथेची सुरुवात गुरुवार दिनांक 30 /3 /2023 पासून ते ७/ ४ /2023 पर्यंत राहणार आहे.
पहाटे ४ ते ६ काकडा भजन ९ ते ११ श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायण व ११ ते १ भोजन व सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व नंतर ७ ते १० श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज दानशूर व्यक्तींच्या अनुदानाच्या पंगती होतील. व शुक्रवार दिनांक ७/४/२००२३ रोजी सकाळी८ ते १०.ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होईल . त्यानंतर लगेचच कै. कडूबाळ गोफणे यांच्या स्मरणार्थ कानिफनाथ गोफने (पोलिस)यांची महाप्रसादाची पंगत होईल.या भेटीसाठी प्रमुख मान्यवर म्हणून श्री .राजेंद्र गंगाधर मुंगसे (बालू मामा) अहमदनगर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सेना लाभणार आहेत.
तरी यावर्षी आगळीवेगळी संगीत भागवत कथा असून सर्व देडगाव व परिसरातील भाविक भक्तांनी याचा मोठ्या उपस्थितीमध्ये लाभ घ्यावा असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी पोपट बनसोडे ,विष्णू मुंगसे, कारभारी गोफेने,बाळासाहेब पाठक, ज्ञानदेव तिडके, वांढेकर परिवार, देविदास मुंगसे, गहिनीनाथ मुंगसे, कुंडलिक पाटील मुंगसे यांच्या वतीने दररोजच्या पंक्तीचे नियोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी पार्थ मेडिकल व सर्जिकल स्टोअर चे मालक श्री. प्रशांत नंदकुमार मुथा (देडगावकर) यांच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दल शाखा देडगाव यांनी केले असून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य मोलाचे कष्ट घेत आहेत.