डिग्रस यात्रा उत्सवात शासनाच्या आदेशाची पायमल्ली,याचे दुष्परिणाम उत्सवात झाली हाणामारी .
दिनांक 22/03/2023 रोजी गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील डिग्रस येथे शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचे व्हीडीओ व्हायरल होताना सध्या दिसत आहे.
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे दिनांक 22/03/2023 रोजी यात्रा उत्सवा निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी डिग्रस यात्रा कमीटीने बैलगाडा शर्यत परवाना फक्त दोन तासाचा काढला होता.त्यामध्ये फक्त बैलगाडा शर्यतीस परवानगी देण्यात आली होती . घोडा बैल शर्यतीस परवाना देण्यात आलेला नव्हता . असे असतान देखिल घोडा बैल शर्यती घेण्यात आल्या होत्या . यावेळी नायब तहसिलदार श्रीमती दंडीले यांनी शर्यती बंद करण्याची सुचना केली असता सर्कल दत्ता गोसावी यांनी शर्यत मैदानावरून पोलीस प्रशासनास घटनेची माहिती दिली होती . शर्यती बंद न केल्यास गुन्हे दाखल करण्यात यावे असेही सांगितले होते . नायब तहसीलदार श्रीमती दंडिले यांच्या सुचने नंतरही घोडा बैल शर्यत बिनधास्तपणे सुरु करण्यात आल्याचे चित्र यावेळी दिसत होते . पोलिस प्रशासनाने नायब तहसीलदार श्रीमती दंडिले यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले होते . आता राहुरी पोलिस प्रशासन यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल करणार का? कि तडजोडच करणार असा स्थानीकांमध्ये व शर्यत प्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे .
शर्यतीच्या वेळेची मुदत संपल्यानंतरही चालू राहिलेल्या घोडा बैल शर्यती दरम्यान उपस्थित असलेल्या काही गटांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली होती .या गटातील युवकांनी याचा राग मनात धरून त्याच दिवशी रात्री ठीक 09 :30 वाजता यात्रेत घुसून हाणामारी करण्यास सुरुवात केली .बाहेरगावच्या तरुणांनी डिग्रसमध्ये यात्रेदरम्यान केलेल्या उच्छादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी दिसत होते .