स्व. बाळासाहेब उंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त माजी मंत्री आमदार शंकराव गडाख यांची दुःखाकित कुटुंबाला भेट
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुकाना गावचे भूमिपुत्र देडगावचे जमीनदार प्रगतशील शेतकरी, खरेदी विक्री संघाचे संचालक स्व. बाळासाहेब देवराव उंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त माजी मंत्री आमदार शंकराव गडाख यांनी उंडे कुटुंबाची भेट घेत कुटुंबाला दिला आधार.
यावेळी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की स्व. बाळासाहेब एक सच्चा कार्यकर्ता हरपला. तो किती दिवस जगला नाही तर कसा जगला हे महत्त्वाचे आहे. नेहमी गडाख कुटुंब या स्व. बाळासाहेब उंडे कुटुंबिया सोबत कायम राहील आशा भावना व्यक्त केल्या व चिरंजीव आदिनाथ बाळासाहेब उंडे याला कुटुंबाबद्दल विचारपूस करत दुःखात सहभागी झाले.
या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन रुपी सेवा झाली .अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब उंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तूवर , शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के, माजी उपसभापती कारभारी चेडे , माजी सभापति कारभारी जावळे, अंकुशराव काळे,विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे , ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे,ह भ प पांडुरंग महाराज रक्ताटे,बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे ,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, हिरामण फुलारी, निलेश कोकरे,महेश चेडे , बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे ,कुलदीप कुलट, आबासाहेब बनसोडे, वसंत मुंगसे, गणेश मुंगसे सर, प्रवीण मुंगसे सर , पैलवान रामा कोकरे,पत्रकार युनूस पठाण व उंडे कुटुंबीयावर प्रेम करणारी विविध स्तरातील मान्यवर , पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी , जय हरी भजनी मंडळ, व
टाळकरी , भजनी मोठ्या संख्येने आदी मान्यवर उपस्थित होते.