सर्व पंथीय ख्रिस्ती वधू- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून ख्रिस्ती समाज संघटितरित्या विकास प्रवाहात आणावा . ---- डॉ. सुधीर तांबे

सर्व पंथीय ख्रिस्ती वधू- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून ख्रिस्ती समाज संघटितरित्या विकास प्रवाहात आणावा .  ---- डॉ. सुधीर तांबे
सर्व पंथीय ख्रिस्ती वधू- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून ख्रिस्ती समाज संघटितरित्या विकास प्रवाहात आणावा .  ---- डॉ. सुधीर तांबे

           संगमनेर  (  प्रतिनिधी )-- महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद व साप्ताहिक उपदेशक च्या माध्यमातून राज्यस्तरीय सर्व पंथीय ख्रिस्ती वधू- वर परिचय मेळाव्याबरोबरच विविध उपक्रमाच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे संघटन करून त्यांना विकास प्रवाहामध्ये आणावे असे प्रतिपादन माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. हॉटेल पंचवटी हॉलमध्ये राज्यस्तरीय सर्व पंथीय ख्रिस्ती वधु- वर परिचय मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेंट मेरी चर्चचे धर्मगुरू रेव्ह फा. जो. गायकवाड हे होते. तर व्यासपीठावर प्रा. बाबा खरात, रत्नाकर पगारे, डॉ. अरविंद सांगळे, बहुजन नेते अशोकराव गायकवाड, रेव्ह. प्रकाश लोखंडे, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, साप्ताहिक उपदेशकचे विक्रम गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, बी.के. गायकवाड, लाजरास केदारी, उद्योजक नितीन खामकर, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

                         डॉ. तांबे म्हणाले की, ख्रिस्ती समाज शांतता प्रिय असून मिशनऱ्यांनी देशाच्या विकास प्रवाहामध्ये शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून भरीव योगदान दिले आहे. शिक्षण व व्यवसायाच्या दृष्टीने समाजाने पुढाकार घ्यावा या वधू- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून अनुरूप व योग्य वधू वर जोडले जातील तर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन साधेपणाने विवाह करावा मेळाव्याचे आयोजक अनिल भोसले व विक्रम गायकवाड यांचेही यावेळी त्यांनी कौतुक केले.वधु -वर परिचय मेळावा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून ख्रिस्ती समाज संघटित होण्यास मदत होईल ही काळाची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. अहिल्यानगर औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, अहमदाबाद येथून मोठ्या संख्येने वधू-वरांनी सहभाग घेऊन दीडशेच्या वर नोंदणी करण्यात आली.

                 मेळावा यशस्वीतेसाठी, पा. शिवाजी लांडगे,  लाजारस केदारी, सविता गायकवाड, प्रभाकर चांदेकर, प्रशांत यादव, सुहास गायकवाड, सिमोन रूप टक्के, सचिन मंतोडे, फ्रान्सिस सोनवणे, सनी गायकवाड, आदित्य घाटगे, रोहित रोहाेम, बेनाडीट केदारी, शशी भाऊ पगारे, फ्रान्सिस रोहोम, दिलीप गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले प्रास्ताविक विक्रम गायकवाड यांनी केले तर अनिल भोसले यांनी आभार मानले