समाज भूषण नानासाहेब जुंधारे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशाने पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नानासाहेब जुंधारे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली फेरनिवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्यमहासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिले फलटण येथील प्रमुख पदाधिकारी बैठक 21 एप्रिल रोजी पार पाडली यामध्ये ही नियुक्ती करण्यात आली पक्षाचे काम करत असताना पक्ष निष्ठा तसेच शेतकऱ्यांच्यासाठी दुध आंदोलन,नदीवरील बंधारे पाण्याने भरून मिळण्यासाठी व दुरुस्तसाठी केलेला पाठपुरावा, रस्त्याचे दुरुस्तसाठी उठवलेला आवाज अशा अनेक समाज कार्याची दाखल घेऊन वरिष्ठनी नियुक्ती केल्याच जुंधारे यांनी सांगितले
यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते,मुख्यमहासचिव माऊली सलगर, उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघ, मणेर चाचा, बबनदादा वीरकर, विष्णु गोरे,प. महाराष्ट्र अध्यक्ष ऍड संजय माने, खंडेराव सरक, रणजित सुळ, शहाजी कोरडकर, सुवर्णाताई जऱ्हाड, नंदकुमार खेमनर,आदि पदाधिकारी उपस्थित होते