दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गणेश वाडी ग्रामस्थांचा सोनई पोलीस स्टेशन वर मोर्चा..
नेवासा तालुक्यातील गणेश वाडी येथील एका युवकास समज देण्याच्या कारणावरून कुठलाही गुन्हा दाखल नसताना सोनई पोलीस प्रशासनाकडूनअमानुषपणे केली गेलेली बेदम मारहाण व त्यामुळे सदरचा युवक अत्यवस्थ झाला होता व व प्रवरा लोणी येथील एका खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये होता.
या गोष्टीची दाद मागण्यासाठी आज सोनई पोलीस स्टेशन येथे विभागीय पोलीस उपायुक्त सुदर्शन मुंडे यांच्याकडे निवेदन दिले. गणेश वाडी ग्रामस्थांच्यावतीने सोनई पोलीस स्टेशन वर जाहीर मोर्चा काढण्यात आला होता. या अनुषंगाने डी वाय एस पी सुदर्शन मुंडे यांनी सदर गोष्टीची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.