शूर आंम्ही वाळूवाले आंम्हाला काय कुणाची भीती ,डिग्रस नांदूर शिवारात वाळूतस्करी तेजीत .

शूर आंम्ही वाळूवाले आंम्हाला काय कुणाची भीती ,डिग्रस नांदूर शिवारात वाळूतस्करी तेजीत .

           

राहुरी तालुक्यातील डिग्रस नांदूर शिवारात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे . नदीपात्रातील पाण्यामधून ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने वाळू उपसा करण्याचे काम चालू आहे . दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू तस्करी होत असून प्रशासनाने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे . स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की ही वाळू तस्करी राहुरी तालुक्यातील स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य यामुळे वाळू तस्कर जोमाने काम करत आहे .

               या वाळू तस्करीमुळे नदीवरील पूलाला धोका निर्माण झाला आहे .तसेच डिग्रस व नांदूर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने सर्वसामान्य नागरिक , शेतकरी व शाळेचे विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत .मुजोर वाळू तस्करांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत .वाळू तस्करांमूळे त्यांना जगणे मुश्कील झाले आहे .आता न्याय मागावा कोणाकडे असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून ही वाळू तस्करी त्वरित थांबवावी व स्थानिक नागरिकांना अभय देऊन न्याय द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे .