श्रीराम विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

श्रीराम विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

श्रीराम विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 

भारत भालेराव प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच हे इंग्रजांना ठणकावून सांगणारे व संपूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा करणारे लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी तसेच वंचितांच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवन परिचय आणि कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले.विद्यालयातील शिक्षक अमोल भालसिंग यांनी आपल्या मनोगतात सामाजिक एकात्मतेसाठी सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव साजरा करून लोकमान्य टिळक यांनी सामाजिक सलोखा निर्माण केला त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजात जन्मलेल्या व दिड दिवस शाळेत जाऊन अण्णाभाऊ साठे लोकशाहीर झाले हा प्रेरणादायी प्रवास आपण समजून घेऊन आयुष्यात काहीतरी चांगले केले पाहिजे असे मत मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा रामदास गायकवाड यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या थोर विभूतींचे स्मरण करत असताना आपण त्यांचे विचार समजून घेऊन आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवून जीवन घडवावे असे मत मांडले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे जेष्ठ शिक्षक भाऊसाहेब टाकळकर,सुधाकर आल्हाट यांचेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल दहातोंडे यांनी तर सुत्रसंचलन श्रीम पूनम वाबळे यांनी केले.