महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा भारतीय मानक ब्युरो, पुणे व राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करारा .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा भारतीय मानक ब्युरो, पुणे व राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करारा .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा भारतीय मानक ब्यूरो, पूणे व राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करार*

*शाश्वत शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापरासंबंधी संशोधनाला चालना मिळणार* *- कुलगुरु डॉ. शरद गडाख*

            भारतीय मानक ब्यूरो व इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्थेबरोबर होणारे दोन्ही सामंजस्य करार शेतकरी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. हे कृषि विद्यापीठ स्थापन होऊन 57 वर्ष झाली आहेत. या 57 वर्षात विद्यापीठाने 306 सुधारीत वाण, 1866 तंत्रज्ञान शिफारशी व 51 कृषि यंत्र अवजारे विकसीत केले आहेत. भारतीय मानक ब्यूरो यांच्या सामंजस्य करारामुळे संशोधीत तंत्रज्ञानाचे मापदंड ठरविण्यास मदत होईल. शाश्वत शेतीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वापरासंबंधी संशोधनाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.

               महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा केंद्र शासनाच्या भारतीय मानक ब्यूरो, पुणे व इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे येथील भारतीय मानक ब्यूरोचे संचालक डॉ. एस.डी. राणे, उपसंचालक श्री. अक्षय कुटे, इस्लामपूर येथील राजाराम बापू तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. एम.व्ही. पिसाळ, संशोधन व विकास विभागाचे समन्वयक डॉ. एस.डी. पाटील, पदव्युत्तर व आचार्य विभागाचे संयोजक डॉ. एस.एस. गावडे, डॉ. पी.बी. देसाई, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड व विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील उपस्थित होते. यावेळी सामजंस्य करारावर डॉ. विठ्ठल शिर्के यांनी विद्यापीठाच्या वतीने तर भारतीय मानक ब्यूरोचे संचालक डॉ. एस.डी. राणे व राजाराम बापू तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. एम.व्ही. पिसाळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

            महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व भारतीय मानक ब्यूरो यांच्यामधील झालेल्या सामंजस्य करारानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक संघ, विद्यार्थी व संशोधक यांच्यासाठी कृषि क्षेत्राशी संबंधीत आधुनिक कृषि प्रात्यक्षिक फार्म स्थापन करणे हा असून एकत्रितपणे प्रशिक्षणे व कमी कालावधीचे प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे व सेमीनार आयोजीत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्था यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार ड्रोन तंत्रज्ञानच्या सहाय्याने पिकांचे सर्वेक्षण करणे, काटेकोर शेती, स्वयंचलीत पाणी व्यवस्थापन, अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर, काढणी पश्चात तंत्रज्ञान, माती व पाणी व्यवस्थापन, शेतीसाठी यंत्र मानवाचा वापर तसेच कृषि क्षेत्रातील टाकावू पदार्थांचा पुर्नवापर, प्रक्रियायुक्त कृषि मालाची प्रत सुधारणे, अन्न प्रदार्थांची गुणवत्ता टिकविण्यासाठी उष्णतेचा वापर, पर्यावरणास अनुकुल अशा पुर्नवापर व विघटनशील घटकांचा वापर या संबंधीचे संशोधन करणे हा या सामंजस्य कराराचा हेतू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब भिटे यांनी मानले.