गहू पिकाच्या जर्मप्लाझम प्रकल्पास कुलगुरू डॉ . पी . जी . पाटील यांची भेट .
*गहू पिकाच्या जर्मप्लाझम प्रकल्पास कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांची भेट*
*राहुरी विद्यापीठ, दि. 15 मार्च, 2024*
.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील प्रक्षेत्रावर गहु पिकातील जर्मप्लाझम प्रकल्पास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, उत्तर प्रदेश कृषि संस्थेचे माजी महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉ. अमित कुमार, कृषि विस्तार विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शिर्के, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, गहु पैदासकार डॉ. सुरेश दोडके व डॉ. सुनिल कदम उपस्थित होते.
यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. पवन कुलवाल व सह अन्वेषक डॉ. सुरेश दोडके यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती देताना सांगितले की या प्रयोगामध्ये गहू पिकाचे एकुण 660 जर्मप्लाझम लावण्यात आले असून जिनोमिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या जर्मप्लाझममधील हवामानासंबंधीची लवचीकता, उत्पादकता व पौस्टिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. या प्रयोगातून अधिक उष्णतेला सहनशील असणारे व उशिरा पेरणीसाठी उपयुक्त ठरणारे वाण संशोधित करणे सोपे होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.