*उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.*

*उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.*

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात शोकसभेचे आयोजन*

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 जानेवारी, 2026*

        महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता (कृषि) डॉ. साताप्पा खरबडे, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे उपस्थित होते.

         यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे श्रध्दांजली अर्पण करतांना म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला हादरा देणारी घटना घडली आहे. मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचा कृषि विद्यापीठांना फार मोठा आधार होता. ते कृषि शास्त्रज्ञांचे फार आदर करीत. त्यांची कामातील दुरदृष्टी, शिस्तबध्दता व कामाच्या वेगामूळे त्यांनी राज्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. मी त्यांना विद्यापीठाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो असे यावेळी ते म्हणाले. यावेळी मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.