श्री.क्षेत्र पावन महागणपती देवस्थान च्या उत्सव सोहळ्याला उद्या दि. 27 पासून सुरुवात.
*श्री.क्षेत्र पावन महागणपती उत्सवात उद्यापासून सुरुवात.*
नेवासा तालुक्यातील देडगाव, पाचुंदा, माका ,म.ल.हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थानचा भव्य उत्साहाचे आयोजन सालाबाद प्रमाणे गेली 27 वर्षापासून अखंड गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज ,महंत सुनीलगिरी महाराज , गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले आहे.

हा उत्साह बुधवार 27 रोजी पासून सुरुवात होत असून शनिवार दिनांक 6 रोजी पर्यंत चालणार आहे. या उत्सवामध्ये दररोज अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे .तर भजन, कीर्तन ,जागर अशी विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये मंगळवार दिनांक 2 रोजी ह भ प महेश महाराज रिंधे यांची कीर्तन रुपी सेवा सायंकाळी 5 ते 6 वेळेत होणार आहे. व बुधवार दिनांक 3 रोजी ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे यांची सायंकाळी पाच ते सहा वेळेत कीर्तन रुपी सेवा पार पडणार आहे.
तर शनिवार दिनांक 6 रोजी काल्याचे किर्तन ह भ प भागवताचार्य बाबासाहेब महाराज मतकर यांचे होणार आहे. अशा विविध कार्यक्रमाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा उत्साह सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान भक्त सेवा मंडळ व बालाजी भजनी मंडळ ,समस्त ग्रामस्थ देडगाव ,पाचुंदा ,माका ,म.ल.हिवरा विशेष कष्ट घेणार आहे.
या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.








