अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील सहा अवैद्य दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे.

अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील सहा अवैद्य दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी//

अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील सहा अवैध दारु अड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडुन छापे . 

 सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. 

 नमुद आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके,पोलीस हेड .कॉन्स्टेबल गणेश लबडे, पोहेकॉ सुयोग सुपेकर, पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, रोहीत येमुल, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अजबे, पो कॉ प्रकाश मांडगे, पोकॉ योगेश कर्डीले, मपोकॉ सारिका दरेकर चालक पोकॉ अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्यावर तातडीचे कारवाई करून सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते. 

 दिनांक 23/08/2025 रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी अहिल्यानगर तालुका सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध देशी विदेशी दारु विक्रेत्यांची माहिती काढुन 6 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. कारवामध्ये अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द एकुण 6 गुन्हे दाखल करुन आरोपीचे ताब्यातुन 50,980/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

पोलीस स्टेशन निहाय कारवाई खालील प्रमाणे

अ.नं. पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यांची संख्या जप्त मुद्देमाल किंमत

1 अहिल्यानगर तालुका 2 8,480/-

2 सोनई 4 42,500/-

* एकुण 6 50,980/-

 

 सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.