शिवांकुर विद्यालयात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा,रक्षाबंधन हा सण बहिण व भावाच्या नात्यातील ऋणानुबंध वाढवणारा सण आहे तो सर्वत्र जपला पाहिजे - सचिव डॉ. प्रकाश पवार .
*शिवांकुर विद्यालयात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा*
शिवांकुर विद्यालयात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . *"रक्षाबंधन हा सण बहिण व भावाच्या नात्यातील ऋणानुबंध वाढवणारा सण आहे" तो सर्वत्र जपला पाहिजे. असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले*
विद्यालयात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये राखी बांधून औक्षण केले. रक्षाबंधन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा राखी स्वरूपाचा आकार करून रक्षाबंधन केले. विद्यालयाच्या शिक्षिका तनुजा झुगे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. या सणाचा सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आनंद घेतला. या सणानिमित्त विद्यालयात राखी बनवणे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा राखी बनवल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगल ताई पवार, युवराज पवार ज्योतीताई शेळके, डॉ. प्रतीक चौहान, तुषार तमनर यांची उपस्थिती लाभली. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी भालदंड व आभार सुनीता ढोकणे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.