श्रीरामपूर - दि. ३१/०७/२०२३ रोजी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे संत एग्नाती लोयलोकार यांचा सण साजरा.

श्रीरामपूर - दि. ३१/०७/२०२३ रोजी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे संत एग्नाती लोयलोकार यांचा सण साजरा.

श्रीरामपूर - दि. ३१/०७/२०२३, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे संत एग्नाती लोयलोकार यांचा सण साजरा करण्यात आला.याप्रसंगी फादर संपत भोसले, ब्रदर ऑलिव्हर, सिस्टर रिटा, सिस्टर जॅकलीन, ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम , अविनाश काळे, लेविन भोसलेसर , सुरेश ठुबे , विशाल पंडित , भगवान भालेराव, आकाश भोसले, योगेश थोरात, विश्वासराव अमोलिक, पास्टर पंडित, मुख्याध्यापक सुनील उबाळे, सुरेश कोळगे, भाऊसाहेब आढाव, विजय पंडित, अश्फाक शेख उपस्थित होते. याप्रसंगी संत एग्नाती लोयलोकार यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या आयुष्य बद्दलची विस्तृत माहिती माननीय लेविन भोसले सर यांनी  विशद करत असतांना संत एग्नाती यांचा जन्म  स्पेन मधील राजघराण्यात झाला. त्यांचं आयुष्य अतिशय सुख-समृद्धीत गेलं. परंतु नंतर त्यांनी ख्रिस्ताचा कार्य करण्यासाठी योजिले असता  वयाच्या  तेहतिसाव्या वर्षी लहान मुलांकडून लॅटिन भाषा अवगत करून घेतली.त्यांनी येशु संघ  स्थापन केला. पॅरिसमध्ये विश्वविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्याबरोबर  संत बेकर व संत फ्रान्सिस झेवियर होते. या सहकाऱ्यांच्या सहाय्याने त्यांनी येशू संघाची स्थापना केली. या येशू संघाचे तीन महत्वाचे गुण आहेत. गरीबी,आज्ञापालन,आजन्म ब्रह्मचार्य. त्यांच्या अधिकारांच्या ते नेहमी अज्ञात राहत असत. संत फ्रान्सिस झेवियर हे भारतात प्रथम गोव्यात आले. तिथे त्यांनी ख्रीस्ताची शिकवण सुरू केली. संपूर्ण जगभर येशु संघिय कार्यरत आहेत. ते शैक्षणिक, धार्मिक, तंत्रशिक्षण अशा विविध संस्थेत कार्य करतात. याप्रसंगी सर्व ख्रिश्चन  धर्मगुरूंना सर्वांनी  सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. Delhi91 Bpslive news  ......Reporter.. Deepak  Kadam. Shrirampur.