विद्यापीठ कुलगुरूंच्या सतर्कतेने डिग्रस येथील रामवाडी विभागात विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण धारकावर हातोडा .
राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे दिवसेंदिवस होणारे अतिक्रमण हे विद्यापीठ पदाधिकाऱ्यांपूढे डोकेदुखीचा विषय ठरला आहे .विद्यापीठ प्रक्षेत्रा लगतच डिग्रस गाव आहे .या ठिकाणीअनेक वर्षापासून हळूहळू विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमणधारकांनी विळखा घातला आहे .अनेक वेळा कारवाई करूनही हे अतिक्रमण थांबण्यास तयार नाही .त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू श्री . पी . जी . पाटील हे सध्या ॲक्शन मोडमध्ये आले आहे .
विद्यापीठाच्या गट नंबर 41 /4 मध्ये रामवाडी शिवारात राहणाऱ्या एका ईसमाच्या अहमदनगर येथून आलेल्या पाहुण्याने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली होती .कर्तव्यदक्ष कुलगुरू यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ कुलसचिव श्री . शिर्के यांना या घटनेची माहिती दिली .श्री शिर्के यांनी वेळ न दवडता विद्यापीठ सुरक्षा अधिकारी श्री .गोरक्षनाथ शेटे यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले.श्री .शेटे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे डिग्रस बीट हवालदार श्री .गणेश सानप यांची मदत घेऊन तसेच विद्यापीठ सुरक्षा सुपरवायझर व सुरक्षारक्षक टीमच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .ज्या व्यक्तीने हे अतिक्रमण केले होते त्यांना तात्काळ अतिक्रमण काढण्यास सांगितले व प्रत्यक्ष उभे राहून हे सर्व अतिक्रमण काढून घेतले .विद्यापीठाच्या या तात्काळ कारवाईमुळे डिग्रस परिसरातील अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली आहे .विद्यापीठाच्या जागेवर झालेले अतिक्रमण अशीच कारवाई करून काढून घ्यावे अशी चर्चा विद्यापीठ पंचक्रोशीत सुरू असल्याचे दिसत आहे .
ज्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे ती जमीन सध्या विद्यापीठाच्या ताब्यात आहे परंतु सदर जमिनीचा वाद हा अहमदनगर न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे .गट नंबर 41 /4 ची जमीनी ज्या मालकांच्या होत्या त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलीही भरपाई मिळालेली नाही तसेच ते जमीन मालक पूर्णपणे भूमिहीन झाल्याचे निदर्शनास आले आहे .विद्यापीठ जमीन ताब्यात देईना आणि त्याच जमिनीवर अतिक्रमण होण्याचे थांबेना यामुळे मूळ जमीन मालक हातबल झाल्याचे दिसत आहे .