नेवासा तहसील कार्यालय येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार आण्णासाहेब मुरलीधर डमाळे यांचे दुःखद निधन
नेवासा तहसील कार्यालय येथे कार्यरत असलेले नायब तहसीलदार आण्णासाहेब डमाळे यांचे दुःखद निधन .
अनेक वर्षापासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले वळण -पिंप्री तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील नायब तहसीलदार आण्णासाहेब मुरलीधर डमाळे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
अकोला, राहुरी, संगमनेर ,नेवासा अशा विविध ठिकाणी त्यांनी महसूल विभागाचा कारभार सांभाळला. ज्यांच्याकडून इमानदारीची मिसाल घ्यावी असे व्यक्तिमत्व असलेले आण्णासाहेब डमाळे यांच्यावर नोबेल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी उपचार सुरू होते. येथेच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
वळण पिंप्री याठिकाणी त्यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यविधीसाठी नेवासा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व महसूल कर्मचारी त्याचप्रमाणे राहुरी महसूल कर्मचारी उपस्थित होते.
नायब तहसीलदार आण्णासाहेब डमाळे यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.