मागणी असलेल्या कापसाच्या बियाणेची दुपटीच्या भावाने विक्री.करणाऱ्या नेवाशात एकावर गुन्हा; ९४, १७६ रुपयांचा मुद्देमालजप्त

मागणी असलेल्या कापसाच्या बियाणेची दुपटीच्या भावाने विक्री.करणाऱ्या  नेवाशात एकावर गुन्हा;  ९४, १७६ रुपयांचा मुद्देमालजप्त

मागणी असलेल्या कापसाच्या बियाणेची दुपटीच्या भावाने विक्री.करणाऱ्या

नेवाशात एकावर गुन्हा;  ९४, १७६ रुपयांचा मुद्देमालजप्त

नेवासे- मागणी असलेल्या कापसाच्या बियाण्यांची जादा दराने विक्री करणाऱ्या एका खासगी व्यक्तीच्या घरी कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. संबंधित व्यक्तीकडून १०९ कापसाच्या बियाण्यासह कांदा बियाण्यांचे एक किलोची दोन पाकिटांसह ५०० रिकामी पाकिटे असा ९४ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहेत. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली  आहे. 

        दरम्यान,   संशयिताने गंगापूर  जि. छत्रपती संभाजीनगर) येथून हे बियाणे आणले आहे. त्यामुळे संबंधित दुकानावरही कारवाई होणार आहे.

         नगर जिल्ह्यात कापसाचे पीक घेण्याला अलीकडे शेतकरी प्राधान्य देत आहेत. यंदाही कापसाचे क्षेत्र अधिक असेल असे दिसतेय. खरीप हंगाम सुरू होत असल्याने कापसाच्या बियाण्याची शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू झाली आहे. मात्र मागणी असलेल्या ठरावीक वाणांची शेतकरी मागणी करत आहेत. एकाच वाणांचा शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये, असे आवाहन कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदींनी केले आहे.

         महेंद्र बबनराव कानडे (रा. नेवासे खु.) ही व्यक्ती मागणी असलेले एका खासगी कंपनीचे बियाणे नेवासा येथे जादा दराने विक्री करत असल्याची माहिती एका निनावी दूरध्वनीवरून कृषी भागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. 

         बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक राहुल ढगे, बापूसाहेब शिंदे, राहुरीचे गुणनियंत्रक निरिक्षक गणेश अनारसे, नेवाशाचे गुणनियंत्रक निरिक्षक प्रताप कोपनर हे कृषि पथकासह  ए. एस. कर्डिले, पी. सी. वैद्य, वर्षा कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने नेवासे खुर्द येथे मध्यरात्री छापा टाकला. 

 जादा दराने कापूस बियाणे विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आहे. तालुक्यात असे प्रकार दिसून आल्यास नागरिकांनी याबाबत  तातडीने कृषी विभागाला माहिती कळवावी. 

- धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे

....