करुणा माता चर्च, वैजापूर येथील पवित्र क्रूस तीर्थक्षेत्री क्रूसाची वाट , प्रार्थना आशिर्वाद व अन्नदान.

करुणा माता चर्च, वैजापूर येथील पवित्र क्रूस तीर्थक्षेत्री क्रूसाची  वाट , प्रार्थना आशिर्वाद व  अन्नदान.
करुणा माता चर्च, वैजापूर येथील पवित्र क्रूस तीर्थक्षेत्री क्रूसाची  वाट , प्रार्थना आशिर्वाद व  अन्नदान.

श्रीरामपूर ( प्रतिनीधी ) - करुणा माता चर्च, वैजापूर येथील पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र वार्षिक यात्रा सोहळा दि. १० फेब्रुवारी २०२४ ला नुकताच मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

               वैजापूर येथील भव्य व सुंदर असे पवित्र तीर्थक्षेत्राची उभारणी ही केवळ विविध ठिकाणच्या ख्रिस्ती तसेच विधर्मीय विश्वासू, श्रद्धावान भाविकांच्या लोकवर्गणीतून झालेली आहे. येथील यात्रेच्या वेळी मनोगत  व्यक्त करतांना  रा. रेव्ह. बिशप आंब्रोज रिबेलो व नवनिर्वाचित बिशप बर्नार्ड लॅन्सी यांनी वैजापूर प्रमुख धर्मगुरू  रेव्ह. फादर संजय ब्राह्मणे व स्वर्गीय रेव्ह. फादर मायकल डिसोझा यांना खुप अभिमाने गौरवण्यात आले. 

            सध्या या उपवास काळात विविध  ख्रिश्चन धर्मग्रामा मधून भाविक ग्रुपने येवून क्रुसाची वाट भक्तीभावाने करून अन्नदान करत आहेत.            

           भाविकांनी आपल्याला जसे सोईस्कर होईल तसे या पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र, वैजापूर,या ठिकाणी पवित्र क्रूसाच्या वाटेची भक्ती करण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत अवश्य यावे. अशी सर्व भाविकांना विनंती केली आहे. प्रत्येक दिवशी वेळ सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत आहे. ( क्रुसाची वाट, मिस्सा, प्रवचन, आजारी भाविकांना आशिर्वाद व  भोजन व्यवस्था ) आपल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत आहे. असे वैजापूर चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर संजय ब्राह्मणे आमच्या प्रतिनिधीशी माहिती देतांना म्हणाले. Delhi91 Bps Live News ---Reporter- Prakash Nikale Shrirampur.