चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

*चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी* 

       नेवासा तालुक्यातील

 गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेल्या चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कॉलेज, सलाबतपुर, मध्ये दि.3 जानेवारी रोजी 'बालिका दिन'व 'सावित्री बाई फुले जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. सावित्री बाई चा वेश धारण केलेल्या विद्यार्थिनी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या .कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.मुख्याध्यापक श्री रवींद्र गावडे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त आंबदास गोरे, रामनाथ साळुंके,कैलास तांबे, अशोक मगर,गणेश साळुंके , पद्माकर मते उपस्थित होते.अकरावीच्या वेदिक शिंदे व निकिता रोडगे यांनी सूत्रसंचालन केले..प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका रेणुका गोरे यांनी केले.कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य श्री.संदीप खाटीक यांनी केले.

     सावित्रीबाई फुले यांचे विचार अनेक विद्यार्थिनींनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तद्नंतर शिक्षिका सौ.मनीषा दळवी यांनी सावित्री बाईंचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक श्री.रविंद्र गावडे सर ,श्री.कैलास तांबे यांनी सावित्री बाईंचे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. सावित्री बाईंचे कार्य हे जगासाठी संजीवनी समान आहे,असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर बनसोडे यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती.वृषाली खाटीक यांनी केले.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.