महापावन गणपती देवस्थान येथे गणेश उत्सव होत आहे मोठ्या उत्साहात संपन्न

महापावन गणपती देवस्थान येथे गणेश उत्सव होत आहे मोठ्या उत्साहात संपन्न

बालाजी देडगाव:-  (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव पाचुंदा , माका परिसरातील वनीकरण मधील श्री. क्षेत्र पावन महागणपती येथे गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून गेली 25 वर्षापासून अखंड परंपरा चालू असून याही वर्षी अनेक विविध कार्यक्रमाने हा उत्सव थाटामाटा संपन्न केला जाणार आहे.

          मंगळवार 19 रोजी पासून ते गुरुवार 28 रोजी पर्यंत हा उत्सव सोहळा संपन्न होणार असून, महाआरती नंतर दररोज सायंकाळी पाच ते सात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज हजारो भाविकांच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांना महाप्रसादाचा आनंद घेता येणार आहे.

       गणेशा उत्सव काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून भाविक मोठी गर्दी करत असून अतिशय प्राचीन असणारे हे मंदिर , निसर्गरम्य वातावरण परिसरामध्ये विविध प्रकारची झाडे यामध्ये सर्वाधिक वटवृक्ष वडाची झाडे हे परिसरातील आकर्षण ठरले आहे त्यामुळे या परिसराला वेगळे महत्त्व असून एक पर्यटन स्थळ म्हणून याची आख्यायिका महाराष्ट्रभर गाजत आहे. या गणपतीचे नवसाला पावणारा गणपती म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे.

          गुरुवार 28 रोजी ह भ प भागवताचार्य संदीप महाराज खंडागळे श्रीक्षेत्र शेकटा संभाजीनगर यांचे काल्याचे किर्तन होणार असून तदनंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

       तरी या उत्सवासाठी जास्तीत जास्त भाविकांनी येऊन या हा उत्सव सोहळा आनंदित व द्विगुणीत करावा असे महापावन गणपती विश्वस्त मंडळांनी आवाहन केले आहे.

          या गणेशोत्सवा सोहळ्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त मोलाचे कष्ट घेत असून विशेष सहकार्य करत आ

हेत.