नवीन राशन धारकास धान्याचा लाभ मिळणे बाबत नेवासा तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी समिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन
नवीन राशन धारकास धान्याचा लाभ मिळणे बाबत नेवासा तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी समिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन.......
नेवासा तालुक्यातील नवीन रेशन धारकास धान्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज नेवासा तालुक्यातील शरद जोशी विचार म्हणजे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नेवासा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
त्या निवेदनामध्ये म्हटले आहे की नवीन रेशन धारकास धान्याचा लाभ लवकरात लवकर मिळावा तसेच नेवासा तालुक्यातील सर्व धान्य दुकानदाराची आपणास नवीन कुपनधारकाचा ठराव दिलेले असून ते आपण अद्याप पर्यंत मंजूर करून घेतलेली नाही त्यावर ती कोणतीही कारवाई केलेली नाही तरी त्वरित कारवाई करून रेशन धारकास धान्य वंचित ठेवू नये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे भयानक संकट गोरगरीब शेतकरी यावर ओढलेले आहे तरी आपण आपल्याकडे दिलेले सर्व धान्य दुकानदाराने दिलेले ठराव मंजूर करून त्यांना लवकरात लवकर धान्याचा कोठा वाढवून मिळावा तसेच आपण लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही कोणत्याही वेळी आंदोलन करणार आहोत असा इशारा आपल्या निवेदनाद्वारे तहसीलदार नेवासा यांना शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
तसेच त्या निवेदना मध्ये विशेष उल्लेख असा केला आहे की नेवासा तालुक्यातील पुरवठा अधिकाऱ्याकडे सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी दोन महिन्यापूर्वी सर्व ठराव दिलेले आहेत तरी अद्याप पर्यंत आपण कारवाई केलेली नाही तरी कामात हलगर्जीपणा होताना दिसत आहे.
या निवेदनावरती राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार ,जिल्हा अहमदनगर अध्यक्ष पंढरीनाथ हनुमंता कोतकर,प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे, नगर जिल्हा संपर्क प्रमुख संदीप गवारे, दौलतराव गणगे, कांदा उत्पादक जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कोरडे, युवा तालुका अध्यक्ष संदीप गंधारे ,तालुका
अध्यक्ष दादा पाटील
नाबदे , तालुका संपर्क प्रमुख दिलीप पोटे ,जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब देशमुख,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अरिफ शेख, अंकुशराव काळे, सर्जेराव हारदे, प्रताप चिंधे यांच्या सह्या आहेत...