भेंड्यात ध्वज पूजनाचा मान एकल महिलांना : नेवासा तालुक्यातून ग्रामपंचायतचे अभिनंदन
भेंड्यात ध्वजपूजनाचा मान एकल महिलांना
नेवासा:- प्रतिनिधी युनुस पठाण
15 ऑगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहन कार्यक्रमात भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीने ध्वज पूजनाचा मान एकल महिलांना देऊन समाजात एक वेगळा पायंडा व आदर्श दृष्टिकोन एकल महिलांविषयी व्यक्त केला गेला .

एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व नेवासा तालुका साऊ एकल महिला समितीचे समन्वयक कारभारी गरड व भेंडा ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला गेला. भेंडा बुद्रुक येथील ग्रामपंचायत मध्ये उषा भगवान पाखरे व फुलारी वस्ती प्राथमिक शाळेत संगीता अनिल शेलार,सुनिता भाऊसाहेब पवार व सानली संतोष खंडागळे या एकल महिलांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले .
सरपंच सुहासिनी किशोर मिसाळ यांच्या हस्ते ग्रामपंचायत, आण्णासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते फुलारी वस्ती शाळा,संगीता गणेश गव्हाणे व उपसरपंच संगीता नामदेव शिंदे , केंद्रशाळा ,भेंडा बुद्रुक शाळा कादर सय्यद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------------------
एकल महिलांकडे समाजातील सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोण सकारात्मक असावा व एकल महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
कारभारी गरड - समन्वयक साऊ एकल महिला समिती - नेवासा तालुका .
----------------------------------------------------------------------------------------
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कादरभाई शेख , शिवाजीराव तागड , बाळासाहेब वाघडकर , ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे , बाबासाहेब गोर्डे, भाऊसाहेब फुलारी , पंढरीनाथ फुलारी, बलभीम फुलारी आदीसह नागरिक उपस्थित होते .
या उपक्रमाबद्दल नेवासा तालुक्यातून भेंडा ग्रामपंचायतचे अभिनंदन होत आहे.








