पिंप्री अवघड येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 79 वा स्वातंत्रदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंप्री अवघड येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 79 वा स्वातंत्रदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंप्री अवघड शाळेत ७९ वा स्वातंत्र्यदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

 

          पिंपरी अवघड जिल्हा परिषद शाळेत ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, प्रथम प्रभात फेरी काढण्यात आली तर ग्रामपंचायतीचा ध्वज माजी सरपंच सौ परवीनबानो शेख यांच्या हस्ते फडकाविन्यात आला तर जिल्हा परिषद शाळेतील ध्वज माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री शिवाजी सोपान लांबे यांच्या शुभ हस्ते फडकवण्यात आला, या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक काशिनाथ नाना दोंड हे होते, यावेळी सर्वच महापुरुषांबद्दल विद्यार्थ्यांनी भाषणे केली, यावेळी पिंपरी अवघड गावचे माजी सरपंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी सर्वच महापुरुषांबद्दल व स्वातंत्र्याबद्दल मनोगत व्यक्त करुन मुलांच्या सर्वांगीण विकास दृष्टीने मार्गदर्शन करुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

           यावेळी मुख्याध्यापक श्री गंगाधर जवरे सर यांनी प्रस्ताविक केले, प्रस्ताविकात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आपण स्पर्धेच्या युगामध्ये राहत आहोत, यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक प्रमाणपत्रा बक्षीसे देण्यात आली या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर पवार, उद्योजक मा.सरपंच बापुसाहेब पटारे,मा.सरपंच सौ. परविनबानो शेख, चेअरमन मच्छिंद्र लांबे, मा.सरपंच भाऊसाहेब लांबे, बाळासाहेब लांबे, अंतवन गायकवाड,महेंद्र लांबे,रामदास धसाळ, रमेश दोंड, सुभाष कांबळे, बादशहा शेख,राजेंद्र पवार, राजेंद्र लांबे, रामदास जाधव, रावसाहेब गायकवाड,नवनाथ देवरे,शिक्षक गण मुख्याध्यापक गंगाधर जवरे,शिवाजी नवाळे, पवार सर,मच्छिंद्र नागटीळक,सौ.संगीता बेंद्रे सौ.ज्योती पुरी, कु अश्विनी लांबे आदी मान्यवर उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कल्हापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले