खेडले परमानंद येथे वेचणी केलेल्या कापसावर चोरट्यांनी मारला डल्ला ;शेतकऱ्याचा सुमारे 10 क्विंटल कापूस गेला चोरी .

खेडले परमानंद येथे वेचणी केलेल्या कापसावर चोरट्यांनी मारला डल्ला ;शेतकऱ्याचा सुमारे 10 क्विंटल कापूस गेला चोरी .

खेडले परमानंद येथील वेचणी केलेला शेतकऱ्याचा दहा क्विंटल कापसावर अज्ञात चोरट्याचा डल्ला .

      

नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील सलीम इनामदार यांच्या शेतातील शेडची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने दहा क्विंटल कापसाची चोरी केली आहे.

       दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले असून भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे .शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस रात्रीच वेचून नेला जात आहे . परंतु सलीम इनामदार यांचा वेचणी केलेला कापूस चोरून नेल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

    

दुष्काळी परिस्थितीत पिकांचे संगोपन करून हाताशी आलेला घास चोरी गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे . सदर घटनेची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शेतमालाची चोरी करणाऱ्या चोरांना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी खेडले परमानंद येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.