टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तालुक्यातील सफाई कामगारांना साहित्य (किट) वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सन २०२४ थाटात व उत्साहात संपन्न झाला.
श्रीरामपुर :- प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तालुक्याचे सन्मा.आमदार लहुजी कानडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजिंग कौन्सिल मेंबर सागर वैद्य साहेब, पिंपरी चिंचवड पुणे महापालिकेचे मा.सहाय्यक आरोग्य अधिकारी ऍड.प्रभाकर तावरे पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचे चि. युवा नेते रोहित वाकचौरे, पंचायत समितीच्या मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जल अभ्यासक भिला सोनू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य सचिव प्रा. डॉ. अनिल लोखंडे सर, संगमनेर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे,शिवसेनेचे (उबाठा) गट तालुकाध्यक्ष राधाकिसन बोरकर, मा. उपसरपंच राजेंद्र कोकणे, अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे,सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ पटारे,प्रा. जयकर मगर, ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे काका, ओंकार स्वामी जंगम, सदाशिव पटारे, निखिल पवार, पढेगावचे सरपंच किशोर बनकर, भोकर चे सरपंच काकासाहेब पटारे, सुदाम पटारे, भैय्या पठाण, शिवाजी दौंड, बाबासाहेब कुसेकर आदीसह मान्यवर प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेचे मा. आरोग्य अधिकारी मा. श्री ऍड. प्रभाकर तावरे पाटील यांनी आरोग्य विषयक मौलिक मार्गदर्शन केले, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कौन्सिल मेंबर सागर वैद्य यांनी उपस्थितांना उत्तम मार्गदर्शन केले तसेच मा. मा सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, रोहित वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कोकणे यांनी करून संस्थेचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील सफाई कामगार स्त्री पुरुष यांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले, व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलवण्यात आला. व तदनंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती ,संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलीकार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, अक्षय कोकणे, दिगंबर मगर, रवी पटारे, सुदाम पटारे, रवींद्र राऊत ,रामेश्वर शिंदे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व अभूतपूर्व असा सफाई कामगारांना साहित्य वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला... कार्यक्रम प्रसंगी विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी,नागरिक, ग्रामस्थ, पुरस्कारार्थी, सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते...