अजामीन पात्र वॉरंट मधील आरोपीस राहुरी पोलिसांनी केली अटक .

अजामीन पात्र वॉरंट मधील आरोपीस राहुरी पोलिसांनी केली अटक .

*अजामीनपात्र वॉरंट मधील आरोपीस राहुरी पोलिसांनी केली अटक*

राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे

  मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी कोर्ट राहुरी यांचे कडील *एन बी डब्ल्यू वॉरंट,केस नंबर RCC - 248/2025 मधील आरोपी नामे सतीश आनंदा चितळकर रा. गौतम नगर, रेल्वे स्टेशन, ता. राहुरी* याला पोलिसांनी दिनांक 24/11/2025 रोजी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, मा.न्यायालयाने सदर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

     तरी राहुरी पोलीस स्टेशन तर्फे कळविण्यात येते की,आपल्याला मा. न्यायालयात हजर राहणे कामी समन्स आल्यावर, सदर तारखेस मा.न्यायालयात हजर राहावे. मा. न्यायालयाच्या कामकाजासाठीसमन्स निघाल्यानंतर हजर न राहिल्यामुळे बेलेबल वॉरंट निघते.व बेलेबल वॉरंट मध्ये ही मा.न्यायालयात हजर न राहिल्यामुळे नॉन बेलेबल वॉरंट निघून अटके सारख्या नामुष्कीला सामोरे जावे लागते.

  सदरची कारवाई मा. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ/ गीते, पोलीस हवालदार/ संदीप ठाणगे, विजय नवले,पोकॉ/जयदीप बडे, योगेश आव्हाड यांनी केलेली आहे