मोक्का गुन्हयातील फरार आरोपी महामार्गवर पुन्हा दरोड्याच्या तयारीत असतांना 4 आरोपी जेरबंद तर इतर आरोपी निष्पन्न
*मोक्का गुन्हयातील फरार आरोपी पुन्हा महामार्गावर दरोडयाच्या तयारीत असतांना जेरबंद*
*4 आरोपी ताब्यात, इतर आरोपी निष्पन्न स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सपोनि/हरिष भोये व पोलीस अंमलदार शाहीद शेख, अरूण गांगुर्डे, अतुल लोटके, वंदना मोढवे, योगेश भिंगारदिवे, शामसुंदर जाधव, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, रोहित येमुल, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे व अरूण मोरे अशांचे पथक नेमून पेट्रोलिंगबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 29/10/2026 रोजी पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, नगर - पुणे महामार्गावर, चास गावचे शिवारातील चास घाटाचे वर भारतीय सैन्य दलाचे वाय आकाराचे चिन्हाजवळ 8 ते 10 इसम हातात धारदार हत्यार, गलोर घेऊन रस्त्याने येणारे वाहनांना अडवून त्यांना मारहाण करून दरोडा टाकण्याचे उद्देशाने थांबलेले आहेत.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता 10 इसम हत्यारे व गलोर घेऊन 3 मोटार सायकलसह दिसल्याने पथकाने छापा टाकुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना ते पळून जाऊ लागले.पथकाने पाठलाग करून 1) सुशांत सुरेश भोसले, वय 23, रा.पिंपळगाव कवडा, ता.अहिल्यानगर 2) वैभव किरण भोसले, वय 26, रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड 3) अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले, वय 23, रा.पिंपळगाव कवडा, ता.अहिल्यानगर 4) राम उर्फ बोकडया उर्फ बठया लखन काळे, वय 19, रा.कामरगाव, ता.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन पळून गेलेल्या इसमांची विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्यांची नावे 5) जाक्या संजय काळे (फरार) 6) आवेश मिरफा भोसले (फरार) 7) जयपाल संजय काळे (फरार) 8) प्रथमेश मिरफा भोसले (फरार) 9) परमेश मिरफा भोसले (फरार) 10) तुषार सावत्या भोसले (फरार) अशी असल्याचे सांगीतले.
पथकाने तपासकामी घटनाठिकाणाहुन 3,02,500/- रू किं.त्यात 3 मोटार सायकल, दोन चाकु, एक टायटन कंपनीचे घडयाळ, एक गलोर असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीकडे त्यांनी यापुर्वी कोठे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुशांत सुरेश भोसले याने त्याचे वरील साथीदारासह चास कामरगाव गावचे शिवारात घाट परिसरात नगर ते पुणे जाणारे महामार्गावर पाच ते सहा वाहनांना अडवून, मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली.आरोपीतांनी सांगीतलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील दाखल गुन्हयांची माहिती घेऊन, गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपास करण्यात येत आहे.
वरील आरोपीविरूध्द नगर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 926/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (4), 310 (5), 310 (6), 313 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
सुपा पोलीस स्टेशन गुरनं 248/2026 बीएनएस 310 (2) सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार प्रतिबंधक अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1)(ii) 3 (2), 3 (4) प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपी 1) सुशांत सुरेश भोसले 2) अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले 3) राम उर्फ बोकडया उर्फ बठया लखन काळे व 4 ) तुषार सावत्या भोसले असे फरार आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध कलमान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.








