चांदा येथे रा . स्व. संघाच्या पथसंचलन व विजयादशमी उत्सवात पंच परिवर्तन आणि इतिहासाचा जागर
*चांदा येथे रा. स्व. संघाच्या पथसंचलन व विजयादशमी उत्सवात ‘पंच परिवर्तन’ आणि इतिहासाचा जागर*

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चांदा उपखंडाचा विजयादशमी उत्सव व पथसंचलन आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाजारतळ येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजनाने झाली. त्यानंतर घोष पथकासह निघालेल्या शिस्तबद्ध व सुसज्ज पथसंचलनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.पथसंचलनाच्या संपूर्ण मार्गात हिंदू माता-भगिनींनी घरासमोर सडा-सम्मार्जन करून सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच पथसंचलनावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साही बनले होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून *वैद्य प्रणव वसंतराव जोशी* आणि प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त अधिकारी *श्री. शरद सदाशिव गाडेकर* यांनी मार्गदर्शन केले.सेवानिवृत्त हवाई दल अधिकारी श्री. गाडेकर यांनी आपल्या सैनिकी जीवनातील अनुभव सांगत राष्ट्रसेवेचे महत्व विशद केले.
आपल्या भाषणात प्रमुख वक्ते वैद्य जोशी यांनी दोन महत्वाचे विषय मांडले -पंच परिवर्तन आणि इतिहासातील आक्रमणे.त्यांनी सांगितले की, इतिहासात हिंदू समाजावर आणि भारतावर झालेल्या आक्रमणांना विसरून चालणार नाही. त्या इतिहासातून बोध घेऊन समाजाला संघटित करणे, हाच विजयादशमीचा खरा संदेश आहे. तसेच संघाने ठरवलेल्या पंच परिवर्तन - समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








