बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .प्रथमतः अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे व मेन पेठ देडगाव येथे अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान तर्फे देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन अरुणराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
गावात सकाळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करुन, दिप प्रज्वलन करण्यात आले .या वेळी अहिल्यादेवी च्या घोषणा देण्यात आल्या.
नंतर सायंकाळी अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने जयंती सोहळा पार पडला. या सोहळ्याचे प्रास्ताविक चाइल्ड इंग्लिश करिअर स्कूल चे संस्थापक सागर बनसोडे सर यांनी केले तर शिव शाहीर कृष्णा कुमार शिरसाट यांच्या व्याख्याने देडगाव परिसर दुमदुमून गेला. त्यांनी आपल्या मधुर वाणीतून अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्रावर मोठा अनमोल प्रसंग सांगितला आपण या महामानवांची विचारांचे खरे वारसदार आहोत व या महापुरुषांचे, महामातांची जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे. म्हणजे समाजात जनजागृती निर्माण होईल.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत ससाने ,व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमानंतर गावभर मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली .अहिल्यादेवी च्या गुंगगानान गाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी या जयंती सोहळ्यास प्रमूख उपस्थिती सोनई चे युवा नेते विकास राजळे व गणेश भाऊ लोंढे लभाली. तर गावातली मेजर गणेश भानुदास टाके, मेजर ज्योतिर्लिंग कानिफनाथ गोयकर, विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर ,नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती कारभारी पाटिल चेडे ,माजी सरपंच रामेश्वर गोयकार , ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे, अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी ,सोमनाथ फुलारी, गणेश मुंगसे सर, अनिल पेठे सर ,गणपत मुंगसे, राजू बनसोडे सर,ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके ,माजी चेअरमन खंडेश्वर कोकरे सर , मार्केट कमिटी संचालक कडूभाऊ तांबे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, उध्दव मुंगसे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, महेश चेडे ,भारत औटी, भारत कोकरे, वंचित आघाडीचे बलभीम सकट, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे ,उद्धव देवा तांदळे, संजय गोयकर , एकनाथ फुलारी, श्रीकांत हिवाळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन आयोजन अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चे संचालक सचिन गोयकर ,भास्करराव गोयकर ,पप्पू भिसे व आदी सदस्यांनी या जयंती निमित्ताने मोठे कष्ट घेतले.
या जयंती सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक युनूस पठाण यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गोयकर यांनी मानले
.