नेवासा तालुक्यातील कौठा येथील सहकारी सोसायटी वर रावसाहेब काळे यांची तज्ञ संचालक पदी निवडीने बालाजी देडगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन .

नेवासा तालुक्यातील कौठा येथील सहकारी सोसायटी वर रावसाहेब काळे यांची तज्ञ संचालक पदी निवडीने बालाजी देडगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन .

   बालाजी देडगाव ( प्रतिनिधी )नेवासा तालुक्यातील मौजे कौठा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या तज्ञ संचालक पदी तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब चंद्रचूड काळे यांची एकमतानं निवड झाल्याबद्दल बालाजी देडगाव परिसरातून त्यांचें कौतुक होत आहे.

         काही दिवसापूर्वी या सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी रावसाहेब शेळके व उपाध्यक्षपदी शिवाजीराव दरंदले यांची एकमताने निवड झाली होती. त्यानंतर सर्व संचालक मंडळाचा विचार घेत एक मताने स्विकृत संचालक म्हणुन राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व ज्यांचा आत्तापर्यंत गावाच्या विकासामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. अनेक पदाच्या माध्यमातून गावची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली .त्यांनी सरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष अशी पदाच्या माध्यमातून गावचा विकास हाच माझा ध्यास या संकल्पनेप्रमाणे त्यांनी गावातील सर्व धर्मियांना जाती ,धर्मांना सोबत घेऊन काम केले. हे गाव अतिशय पुरोगामी विचार धारेच गाव असल्याने हुशार व तज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वर सर्वानुमते तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली . रावसाहेब काळे पाटिल यांची एक प्रगतशील बागायत शेतकरी म्हणुन तालुक्यात ख्याती आहे.

     रावसाहेब चंद्रचूड काळे यांच्या या निवडीने तालुक्यातून विविध संघटना व शाखेच्या वतीने त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देडगाव हे चांगल्या कामाचं कौतुक करणारा गाव आहे. म्हणून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

          देडगाव मधून देडगावचे ज्येष्ट नागरिक तथा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक बाजीराव पाटील मुंगसे,विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, पंचायत समितीचे मा.उपसभापती कारभारी पाटील चेडे ,ज्येष्ट पत्रकार बन्‍सी भाऊ एडके ,बालाजी पाणीवाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, बालाजी देवस्थान चे अध्यक्ष नवनाथ मुंगसे ,विश्वस्त सुभाष मुंगसे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत ससाने, युवा नेते निलेश कोकरे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,बागायतदार बाळासाहेब पाठक, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, प्रगतशील बागातदार चंद्रभान कदम ,मार्केट कमिटीचे संचालक कडूभाऊ तांबे , शिवसेना तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे, महादेव मुंगसे अशा विविध मान्यवरां कडून व विवीध शाखे च्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.