पानसवाडी येथे पेयजल योजनेअंतर्गत घरोघरी नळ योजनेचा शुभारंभ .
पानसवाडी येथे पेयजल योजनेअंतर्गत घरोघरीं नळ योजनेचा शुभारंभ.
स्व . माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या केंद्र शासनाच्या ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ आज पानसवाडी येथे करण्यात आला .या योजने अंतर्गत घरोघरी नळ जोडणीचा शुभारंभ मार्गदर्शक ज्ञानदेव पाटील गडाख यांच्या हस्ते करण्यात आला . या वेळी कृष्णराव गडाख पेशवे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पा .गडाख रविराज तुकाराम गडाख त्याच बरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .या योजनेच्या शुभारंभ श्रीफळ वाढवुन करण्यात आला . स्वर्गीय भाऊंचे स्वप्नं आज पुर्ण होत आहे मात्र त्याची उणीव त्यांच्या कुटुंबियां बरोबर ग्रामस्थांना भासत होती उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात भाऊंची उणीव पुन्हा एकदा घर करुन गेली . कै . तुकाराम गडाख हे संघर्ष मय नेतृत्व म्हणुन अहमदनगर जिल्ह्याला परिचित होते प्रस्थापितां विरुद्ध लढवय्या नेता म्हणुन ते जिल्ह्याला परिचित होते यातुन त्यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या . त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पुर्ण होत आहे .युवा नेते रवी दादा गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पानसवाडी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असुन स्वर्गीय भाऊंना जी कामे अपेक्षित होते ते ते सर्व कामे रवी दादा गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे रवी दादा गडाख यांनी सांगितले .