सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडोर एक्सप्रेस लवकर सुरुवात. .! !केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी. .! !
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चेन्नई-सुरत या सहापदरी महामार्गाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे. सुरत ते चेन्नई हे एक हजार 600 किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे एक हजार 250 किलोमीटरवर येणार
Surat Chennai Expressway : अहमदनगर सह राज्यातील ह्या जिल्ह्यांतून जाणार ! पहा तुमचे गाव आहे का त्यात :- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चेन्नई-सुरत या सहापदरी महामार्गाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे. सुरत ते चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे 1250 किलोमीटरवर येणार आहे.भाजीपाला थेट बंदरावर
या महामार्गा मुळे जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी महामार्गामुळे जिल्ह्यालाही मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातून उत्पादित होणारा कृषिमाल निर्यात करण्यासाठीच्या लॉजिस्टिक कॉस्टमध्ये घट होणार आहे. हा भाजीपाला थेट बंदरावर पाठविता येणार आहे. आदिवासी भागातून जाणाऱ्या या महामार्गामुळे त्या परिसराचा विकास होण्यासही मदत होईल.
*हैद्राबादमार्गे थेट चेन्नईला जाणे शक्य !*
भारतमाला योजनेअंतर्गत केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाच्या वतीने ‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’ उभारण्यात येणार आहे. सुरत-नाशिक- अहमदनगर -सोलापूर-हैद्राबाद मार्गे थेट चेन्नईला जाणे शक्य होणार आहे.
*चेन्नईला अवघ्या 12 तासांत जाणार. !*
‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’ या नव्या महामार्गामुळे सुरत वरून चेन्नईला अवघ्या 12 तासांत पोहोचता येईल. सध्या असलेले सुरत व चेन्नई मधील 1600 किलोमीटर च अंतर हे केवळ 1271 किलोमीटर होणार आहे.
*या 5 जिल्ह्यातून जाणार !*
‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’ हा महामार्ग महाराष्ट्रातील *नाशिक , अहमदनगर , बीड, उस्मानाबाद, सोलापूर* या 5 जिल्ह्यातून जाणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हा रास्ता बांधून पूर्ण करणार आहे.
‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’हा महामार्ग 6 पदरी नियोजित असून याची रुंदी 70 मीटर असले मात्र महामार्गाची जमीन अधिग्रण हे 100 मीटर साठी होईल. साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत हा रास्ता बांधून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. यातील सुरत नाशिक अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR तयार आहे.‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’ या महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील 18, राहता तालुक्यातील 5, राहुरीतील 24 व नगर तालुक्यातील 9 गावातील 850 हेक्टरचे संपादन केले जाणार आहे.
हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली गुरव ,तळेगाव, वडझरी , कासारे , लोहारे, गोगलगाव, सदतपूर , हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे— खडांबे वांबोरी मांजरसुम्भा पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी, सोनेवाडी पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील आठवड मधून पुढे आष्टी जिल्हा बीड मध्ये प्रवेश करेल.
यामध्ये यामध्ये आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.जामखेड तालुक्यातील डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, दिसलेवाडी खांडवी बावी राजेवाडी नान्नज पोतेवाडी चोभेवाडी मार्गे पुढे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात जाईल.
नगर जिल्ह्यातून 100 किलोमीटरचा हा हायवे असणार आहे. यात, संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातील गावांमधून हा मार्ग जाणार आहे.
संगमनेर तालुक्यातील 13 गावांची 282 हेक्टर जमीन, राहाता तालुक्यातील 5 गावांमधील 94 हेक्टर, राहुरी तालुक्याच्या 19 गावांतील 428 हेक्टर आणि नगर तालुक्यातील 10 गावांची 256 हेक्टर अशी साधारणतः 1061 हेक्टर, तसेच इंटरचेंजसाठी 125 हेक्टर आणि अतिरीक्त 10 अशी एकूण 1200 हेक्टर जमिनीचे या मार्गासाठी संपादन केली जाणार आहे.
भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी केंद्र सरकारने अंदाजे 1020 कोटींची तरतूद केलेली आहे.
पुढे ‘सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे’ महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातुन उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करेल. या महामार्गामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा व तुळजापूर या दोन तालुक्यातील साधारण पाने 35 गावे बाधित होणार असून लवकरच या गावातील जमिनीचे अधिग्रहण करण्यात येईल.