5G उदघाटन प्रसंगी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यवाहिनी द्वारे भारतातील शेतकऱ्यांशी साधला संवाद .* 

5G उदघाटन प्रसंगी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यवाहिनी द्वारे भारतातील शेतकऱ्यांशी साधला संवाद .* 
बी पी एस लाईव्ह न्युज दिल्ली 
नागपूर:-नवीन दिल्ली येथील प्रगती मैदान मध्ये पार पडलेल्या  ५G उदघाटन प्रसंगी माननीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजींनी ऑनलाईन च्या माध्यमातून सॉलिडॅरिडॅड च्या स्मार्ट ऍग्री कार्यक्रमात महाराष्ट्रातून, नागपूर, वर्धा, आणि अमरावती येथून जुळलेल्या शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. ह्या प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील शेतकरी श्री. हर्षल तोंडरे आणि महिला शेतकरी सौ रिता प्रवीण गावन्डे ह्यांनी प्रधानमंत्री महोदय ह्यांच्या प्रश्नाना सविस्तर उत्तरे दिली व कार्यक्रमातून मिळणारे प्रशिक्षण व

होणारे लाभ ह्यासंबंधी माहिती सादर केली. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून जुळलेल्या शेतकऱ्यांना श्री अनुकूल नागी, कार्यक्रम प्रमुख,  सॉलिडॅरिडॅड सेंटर नागपूर, ह्यांच्या नेतृत्वाखाली व प्रकल्प प्रबंधक डॉ प्रशांत राजनकर आणि श्री. महेश सोलासे, सॉलिडॅरिडॅड ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सूचना व माहिती देण्यात आली होती.  वोडाफोन आयडिया फौंडेशन आणि सॉलिडॅरिडाड च्या माध्यमातून  स्मार्ट ऍग्री कार्यक्रम गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्रात राबवल्या जात आहे ज्यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नांदेड येथील अंदाजे १ लाख शेतकरी जुळलेले आहे. ह्या सगळ्या शेतकऱ्यांना ऍडवायजरी, मिस कॉल अलर्ट च्या माध्यमातून शेती प्रबंधन, सिंचन प्रबंधन, किट प्रबंधन इत्यादी ची सविस्तर माहिती साप्ताहिक पुरविली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन करणे सोपे झाले आहे तसेच त्यांच्या वार्षिक उत्पनात देखील वाढ झालेली आहे.